Natural Resources Management

120598408_863859820817011_5118111634696629891_n

Natural Resources Management

“या नभाने या भुईला दान द्यावे;
आणि या मातीतून चैतन्य गावे..”*
.. पण सततच्या दुष्काळाने ही चैतन्याची परंपरा अखंड राहील की नाही अशी स्थिती ५/६ वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील नजिकपांगरी परिसरात होती. नंदकिशोर वाघ, इथले एक प्रगतीशील शेतकरी; यांना व या परिसरातील इतरांना देखील आपल्या द्राक्षबागा पाण्याअभावी मोडून टाकाव्या लागल्या होत्या. सावित्रीबाई फुले मंडळाने ग्रामस्थ व प्राज फाऊंडेशन, नाबार्ड (नजिकपांगरी), ग्राईंड मास्टर, विनोदराय इंजिनियरिंग (केळीगव्हाण) यांच्या भक्कम पाठिंब्यानं पाण्याची कामं पूर्ण केली. आता कमी पाऊस पडूनही इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं आहे. पाण्यासोबतच कृषी विस्तार कार्यक्रमामुळे पीक पद्धती बदललीय. ‘मी आता रेशीम शेतीतून दरवर्षी २ लाख कमवतो’ नंदकिशोर वाघ अभिमानानं सांगतात!
शाश्वत जलस्त्रोत विकास, पाणलोट विकास कार्यक्रम, जलसाक्षरता, एकात्मिक पोषण व कीड नियंत्रण, शेतकी उत्पाद कंपन्या या सर्व प्रकल्पांद्वारे ७२ गावं आणि १५००० हून अधिक आनंदी शेतकरी परिवार ही सावित्रीबाई फुले मंडळाच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाची आजवरची कमाई!!
(* पद्मश्री ना. धों. महानोर यांची कविता)

Leave a Comment

Your email address will not be published.