Glossary of Humanity
‘जेथ संपत्ती आणि दया। दोन्ही वसतीं आलिया ठाया। तेथ म्हणे धनंजया। वसती माझी॥’ (ज्ञानेश्वरी)
शहरातील दोन प्रथितयश उद्योजक- श्री विवेक कोरांगळेकर आणि श्री शिरीष लोया यांनी सावित्रीबाई फुले मंडळाच्या कामात आपला वेळ देऊन मूल्यवर्धन करायचं ठरवलं. आज ते मंडळाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या उपेक्षित वस्त्यांतील महिला पुरुषांना त्यांचे व्यवसाय सुरु करायला सर्वतोपरी मदत करताहेत. ब्रँडिंग, आॅनलाईन मार्केटिंग, कर्ज या व्यवसाय उभारणीच्या अत्यावश्यक गोष्टींत मदत करताहेत. यातून अनेकजण पहिल्यांदाच व्यवसायिक बनताहेत. सावित्रीबाई फुले मंडळाबरोबर राहून असं अर्थपूर्ण सामाजिक काम करणारी स्वयंसेवी प्रोफेशनल्सची टीम हे आमचं बलस्थान आहे.